kolhapur Crime | मृत पतीचे ७० लाख सासू, दिराने लाटले; विधवा सुनेची तक्रार File Photo
कोल्हापूर

kolhapur Crime | मृत पतीचे ७० लाख सासू, दिराने लाटले; विधवा सुनेची तक्रार

तिघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मृत पतीच्या विम्याचे आणि पीएफचे पत्नीच्या नावे असलेले ७० लाख रुपये सासू व दिराने हडप केले. याप्रकरणी सासू भारती सुरेश पाटील, दीर अनिरुद्ध आणि बँकेचे तत्कालीन शाखा अधिकारी यांच्‍यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबातची फिर्याद मृताची पत्नी निकिता श्रीधर पाटील (२७, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी दिली. ४ एप्रिल २०२३ ते १५ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली.

श्रीधर यांच्याशी निकिताचा १६ ऑगस्ट २०२२ ला विवाह झाला होता. अवघ्या आठ महिन्यांत श्रीधर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या विम्याचे ५० लाख, भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युईटीची २० लाख ५८ हजार रुपयांची रक्कम निकिता यांच्या खात्यावर जमा झाली. दीर अनिरुद्ध बँकेत नोकरीस होता. त्‍याने त्‍या बँकेत निकिताचे खाते उघडले. यासाठी स्वत:चा मोबाईल व मेलची नोंदणी केली. संबंधित बँक शाखाधिकाऱ्याला हाताशी धरून प्रथम ३० लाख, नंतर २० लाख रुपये आई भारती पाटील यांच्या खात्यावर वळवले. यानंतर ग्रॅच्युईटीचे २० लाख ५८ हजार रुपये वर्ग करताना हा प्रकार निकिताच्या लक्षात आला. त्यांनी तक्रार दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अनिरुद्धने निकिता यांच्या कोऱ्या कागदावर व बँक फॉर्मवर सह्या घेतल्या होत्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT