Satej Patil  Pudhari File Photo
कोल्हापूर

Satej Patil | गोकुळचे मतदान झाल्यावर कळेल; बिनआवाजाचा बॉम्ब फुटेल : सतेज पाटील

महायुतीच्या सत्ता मिळण्याच्या दाव्याला सूचक इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे राजकीय रण तापले असतानाच राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला सूचक इशारा दिला आहे. ‘गोकुळचे मतदान झाल्यावर कळेल; बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार आहे’, असे वक्तव्य त्यांनी सोमवारी केले. ‘ठिणगी सहा महिन्यांपूर्वीच पडली होती; आता वणवा पेटला आहे’, असे सांगत त्यांनी गोकुळच्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या निमित्ताने आले असता पत्रकारांनी सतेज पाटील यांना गोकुळप्रश्नी महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत वादाबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले, तो त्यांच्यातील वाद आहे. काय परिस्थिती आहे, काय नाही, हे त्यांनी बघायचे आहे. मात्र, गोकुळच्या दूध उत्पादकाला परिस्थिती कळाली आहे. महायुतीसोबत जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे.

ज्येष्ठ असूनही महायुतीत विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांचा सन्मान नाही

महायुतीत ज्येष्ठ असूनही विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा सन्मान राखला जात नाही. आपण आणि मुश्रीफ सत्तेत होतो, त्यावेळी हे दोघे आमच्या डाव्या व उजव्या बाजूला होते. ते आता माहितीत शोधावे लागत आहेत, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला. ए. वाय. पाटील तात्पुरते आमच्याकडे आले होते. त्याचा आम्हालाही फायदा झाला. त्यांचे भाऊ मात्र आमच्याकडेच आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT