Shaktipeeth Highway Pudhari Photo
कोल्हापूर

Shaktipeeth Highway | मोजणीस येणार्‍यांना चोप देऊ : शेट्टी

शक्‍तिपीठ महामार्गविरोधी कृती समिती बैठकीत इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : शक्‍तिपीठ महामार्गास शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्‍यामुळे मोजणीसाठी आल्‍यास चोप देऊ, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ७ सप्‍टेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर नोटीसची होळी करून अधिकार्‍यांना जाब विचारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

शक्‍तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्‍यासाठी शक्‍तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीतर्फे गुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकर्‍यांचा अंत पाहू नका, असे सांगून समन्‍वयक गिरीश फोंडे यांनी सरकारने अधिसूचनेवर आलेल्‍या हरकती जाहरी करा; मग शेतकर्‍यांचा पाठिंबा आहे की विरोध हे समजेल, असे सांगितले.

३ सप्‍टेंबर रोजी जिल्‍ह्यातील ७८ बाधित गावांत एकाच दिवशी नोटीसची होळी केली जाईल. ७ सप्‍टेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर नोटीसची होळी केली जाईल. तर, ९ सप्‍टेंबर रोजी करवीर तालुक्‍यातील हसूर दुमाला येथे जिल्‍ह्यातील सर्व शेतकरी सामुदायिकरीत्‍या मोजणीस विरोध करून मोजणी हाणून पाडण्‍याचे आंदोलन करण्‍यात येईल. यावेळी दिलीप पाटील, कॅ. उत्तम पाटील, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, ज्ञानदेव यादव यांची भाषणे झाली. यावेळी विक्रांत पाटील- किणीकर, कृष्‍णा साबळे, अमित नाळे, शिवाजी कांबळे उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT