कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील काही भागाला पाणीपुरवठा करणार्या चंबुखडी टाकीवरून येणार्या २७ इंची मुख्य वाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम सोमवारी (दि. ३०) करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी वॉर्ड व त्यास संलग्न उपनगरे आदी ठिकाणी सोमवारी पाणीपुरवठा बंद राहील. तर मंगळवारी (दि. १) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा. तसेच, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या भागांवर होणार परिणाम
ए, बी वॉर्ड व संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग, दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब, खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी पाचवी, सहावी, सातवी व आठवी गल्ली, कुंभार गल्ली आणि बागल चौक परिसर.