कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : निम्म्या कोल्हापूरला पाणीपुरवठा करणार्या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत आयटीआय येथे क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात येणार आहे. 1,100 मि.मी. व्यासाची सिमेंट काँक्रीटची जलवाहिनी काढून त्या ठिकाणी लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, गुरुवारी व शुक्रवारी (दि. 25 व 26) शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह निम्म्या कोल्हापूर शहरात पाणीबाणी निर्माण होणार आहे. तसेच शनिवारी (दि. 27) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
शहरातील ए, बी वॉर्डमधील पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या कळंबा जेलसमोरील परिसर, वसंत
विश्वास पार्क, एल.आय.सी. कॉलनी, अमरनाथ मंदिर परिसर, बाबुराव साळोखे पार्क, तपोवन, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी, बापूरामनगर, प्रथमेशनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, बुद्धिहाळकरनगर, वाल्मीकी आंबेडकरनगर, हस्तिनापूर नगरी, शांती उद्यान परिसर, शिवगंगा कॉलनी, श्रीराम कॉलनी, साई कॉलनी, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद, एन. टी. सरनाईकनगर, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी, गणपतीनगर, पार्वती पार्क, भोसले कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, शिवप्रभूनगर, मोरे-माने नगर, राणे कॉलनी, आक्काताई मानेनगर, महादेव नगरी, जनाईदत्तनगर, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर स्टँड परिसर, नवीन मोरे कॉलनी, जोशीनगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, कोल्हापूर सॉ मिल, गंजीमाळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुकानगर, आर.के.नगर, गणेश कॉलनी, हनुमाननगर, जोतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडियम, बालाजी पार्क, यशवंत कमल पार्क, जाधवनगर, खंडोबा मंदिर परिसर, भारतनगर, सुभाषनगर, वाय. पी. पोवारनगर, वारे वसाहत, शाहू बँक परिसर, राम गल्ली, मंगेशकरनगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव तालीम, जासूद गल्ली, कोळेकर तिकटी, पोवार गल्ली, वेताळमाळ तालीम, 8 नंबर शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट, कोंडेकर गल्ली, सरदार तालीम परिसर, शहाजी वसाहत, साळोखेनगर टाकीअंतर्गत कणेरकरनगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बोंद्रेनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, हिंदू कॉलनी, सुलोचना पार्क, राधानगरी रोड, क्रशर चौक, मोहिते पार्क, केदार पार्क, देशमुख शाळा, शिवाली पार्क आदी भागांत दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.