कोल्हापूर : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी इराणी खण येथे पाहणी करून अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर यांना सूचना दिल्या.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

kolhapur | मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व परिसरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रंकाळा परिसरातील इराणी खणीतच होणार आहे. पारंपरिक मार्ग गंगावेश चौकातून पंचगंगा घाटाकडे जाणारा रस्ता बॅरिकेडिंग करून गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री अडविला. मंडळांनी मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

धोकादायक इमारतीत उभा राहू नका

पोलिसांच्या सूचनांनुसार विसर्जन मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस्‌, वॉच टॉवर व विद्युत व्यवस्था केली आहे. धोकादायक सहा इमारतींच्या परिसरात बॅरिकेडस्‌ उभारून सूचना फलक लावले आहेत. महाद्वार रोडवरील पाच व गंगावेश येथील एका इमारतीचा त्यात समावेश आहे. नागरिकांनी या इमारतींत प्रवेश करू नये व इमारतींच्या खाली उभे राहू नये, असे आवाहन केले आहे.

विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे

मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांवर डांबरी पॅचवर्क पूर्ण केलेे आहे. अडथळे व अतिक्रमणे काढली असून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. इराणी खण व मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून विसर्जनस्थळी अग्निशमन दलाचे पथक व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा

मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, गंगावेश चौक या मार्गावर सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविली आहे. मार्गावर अतिरिक्त विद्युत व्यवस्थेसाठी हेरिटेज खांबांवर २०० वॅट क्षमतेचे ३० फ्लड लाईट बसविले आहेत. पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा. आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता अमीत दळवी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे उपस्थित होते.

आयुक्त डॉ. भारूड यांनी केली पाहणी

विसर्जन मार्ग तसेच विसर्जन स्थळावरील तयारीची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी पाहणी केली. त्यांनी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा व इराणी खण परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT