वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने दीपावलीनिमित सभासदांना प्रतिवर्षी प्रमाणे तूप भेट देण्यात येणार आहे येत्या दि.२ ते १५ नोव्हेंबर कालावधीत संबंधित प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्रे व वितरक यांच्यामार्फत संघाच्या सभासदांना तूपवाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थाकडे सभासदांना २ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तूप वितरण केले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक संघाने संबंधित सर्व दूध संस्थाना पाठविले असून कोल्हापूर व परिसरातील अ वर्ग व क वर्ग सभासदांचे तुपाचे स्टेशन रोड कोल्हापूर येथील विक्री केंद्रातून दोन नोव्हेंबरपासून वाटप सुरु होणार आहे. सभासदांनी ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप घेवून जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले.
यावेळी संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, उपाध्यक्ष ॲड.एन.आर. पाटील, संचालक मंडळ,फॅक्टरी मॅनेजर धनंजय लाड,श्रीधर बुधाले, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले,संकलन व्यवस्थापक डॉ.जे.बी.पाटील, असि.मॅनेजर अकौंटस प्रविण शेलार, आदी उपस्थित होते.