कोल्हापूर जिल्ह्यातील 14 सह. संस्थांसाठी 17, 18 मे रोजी मतदान Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील 14 सह. संस्थांसाठी 17, 18 मे रोजी मतदान

अर्ज भरण्यास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील 14 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. या 14 सहकारी संस्थांपैकी 2 संस्थांसाठी दि. 17 मे व उर्वरित 12 संस्थांसाठी 18 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

शिवाजी युनिव्हर्सिटी सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर स्टोअर्स, कोल्हापूर जिल्हा कृषी सहकारी उद्योग खरेदी-विक्री संस्था, चंदगड तालुका सहकारी ग्राम उद्योग संघ यांच्यासह निवडणूक जाहीर झालेल्या संस्थांमध्ये कै. रघुवीर अवटी सेवा संस्था मर्यादित अकिवाट (ता. शिरोळ), कृष्णा सेवा संस्था राजापूरवाडी शिरूर (ता. शिरोळ), सिद्धार्थ मागासवर्गीय औद्योगिक संस्था शहापूर (ता. हातकणंगले), मँचेस्टर मागासवर्गीय औद्योग संस्था इचलकरंजी, भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था माणगाव (ता. हातकणंगले), गौतम बुद्ध मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक संस्था इचलकरंजी, वाल्मिकी मेहतर मागासवर्गीय औद्योगिक संस्था शहापूर (ता. हातकणंगले), दत्तात्रय धोंडे पाटील विकास सेवा संस्था कसबा तारळे (ता. राधानगरी), नवभारत मागासवर्गीय औद्योगिक संस्था अर्जुनी (ता. कागल) या संस्थांसाठी दि. 18 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था धुंदवडे (ता. गगनबावडा), स्वातंत्र्यसैनिक धोंडिराम कुरणे सेवा संस्था कुरणेवाडी (ता. राधानगरी) या संस्थांसाठी दि. 17 मे रोजी मतदान होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दि. 22 एप्रिल पर्यंत आहे. दि. 23 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. दि. 24 एप्रिल पासून दि. 8 मेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. दि. 9 मे रोजी चिन्ह वाटप होईल. दि. 18 मे रोजी मतदान घेण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT