कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनोख्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये मतदानासाठी जनजागृती केली आहे. तसेच त्याचा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मिडीया माध्यमांवर शेअर केला आहे.
अधिकाऱ्यांनी केलेल्या या व्हिडीओमध्ये जुन्या गाण्याच्या चालीवर जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी अभिनय करत मतदारांना साद घातली आहे. कोल्हापूर जिल्हा हा मतदानाच्या टक्केवारी मध्ये नेहमी अग्रेसर राहिला आहे. मतदानाची ही टक्केवारी आणखी वाढावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी खास गाण्याची निर्मिती केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या या गाण्याचं नागरिक कौतुक करत आहेत.