इचलकरंजी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निवासस्थानी स्वागत करताना आ. प्रकाश आवाडे. शेजारी डॉ. राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे आदी.  File Photo
कोल्हापूर

एकसंधपणाने निवडणुकीला सामोरे जाणार : आ. आवाडे

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याशी असलेल्या मतभेदाला पूर्णविराम मिळाला असून, कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाने येणार्‍या निवडणुकीला भाजप म्हणून एकसंधपणे सामोरे जाऊ. सुरेश हाळवणकर व आपण मिळून पुढची राजकीय रणनीती, पक्षाची ध्येयधोरणे ठरवू, असे प्रतिपादन आ. प्रकाश आवाडे यांनी केले. राहुल आवाडे उच्चांकी मतांनी निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आवाडे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत एकत्रितपणाने जोमाने कामाला लागून इचलकरंजी विधानसभेचा विजय राज्यात उच्चांकी ठरावा यासाठी प्रयत्नशील राहावे, असे बावनकुळे यांनी नमूद केले. डॉ. राहुल आवाडे यांनी आगामी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहावे यासाठी मिळून काम करू. पक्षाकडे उमेदवारी मागितली असून ती निश्चित मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी किशोरी आवाडे, प्रकाश दत्तवाडे, स्वप्निल आवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सौ. मोश्मी आवाडे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT