कोल्हापूर : ‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापिका श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त पं. विनोदबुवा डिग्रजकर, मंजुषा पाटील यांना ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी खा. शाहू महाराज, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक, आ. अशोकराव माने, आ. राहुल आवाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, माजी खा. राजू शेट्टी, उद्योजक संजय घोडावत, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, प्रियंका भावे आदी उपस्थित होते. (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

विनोदबुवा डिग्रजकर, मंजुषा पाटील यांना ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक’ अ‍ॅवॉर्ड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापिका, संगीतसाधिका श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित विनोदबुवा डिग्रजकर, ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील-कुलकर्णी यांना ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ शनिवारी कोल्हापुरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी खा. शाहू महाराज, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संगीत क्षेत्रातील दिग्गजांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येत असून पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. यंदा कोल्हापुरातील सायबर कॅम्पसमधील आनंदभवन येथे कार्यक्रम झाला. विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. दर्डा यांनी प्रास्ताविकात पुरस्काराबद्दलची माहिती दिली. कोल्हापूर हे तिखट खाणार्‍या गोड माणसांचे गाव असून येथे मोठी माणसे घडल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. संगीत ही जीवन जगण्याची कला आहे. औषधाने ज्या गोष्टी बर्‍या होत नाहीत, त्या संगीतामुळे होतात. सप्तसुरांचे नाते जीवनभर टिकते, असे ते म्हणाले.

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, प्रियंका भावे यांच्या संगीत मैफलीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. अशोकराव माने, आ. राहुल आवाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, माजी खा. राजू शेट्टी, उद्योेगपती संजय घोडावत, उद्योजक व्ही. बी. पाटील, बाळ पाटणकर, सिद्धार्थ शहा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT