वारणानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख आ. डॉ. विनय कोरे यांना जाहीर झाला आहे. मुंबई येथे संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
शनिवारी दि. ४ जून रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सहकार गौरव पुरस्कार २०२६ वितरण होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशपातळीवरील सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आ. कोरे यांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने त्यांना हा सहकार भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.