Nitin Menon Passes Away | ज्येष्ठ उद्योजक नितीन मेनन यांचे निधन 
कोल्हापूर

Nitin Menon Passes Away | ज्येष्ठ उद्योजक नितीन मेनन यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले ज्येष्ठ उद्योजक, मेनन बेअरिंग्ज लिमिटेडचे चेअरमन नितीन राम मेनन (वय ५९) यांचे शनिवारी (दि. २१) निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या उद्योगविश्वातील एक दूरदृष्टीचे, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

वडील राम मेनन यांचा औद्योगिक वारसा समर्थपणे पुढे नेत नितीन यांनी मेनन बेअरिंग्ज लिमिटेडच्या प्रगतीत, विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आधुनिकीकरण, गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला. मिश्रधातूंच्या निर्मितीपासून बेअरिंग्जच्या अंतिम मशिनिंगपर्यंत उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर स्वयंपूर्णत: साधण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल उद्योगातही विश्वासार्ह उत्पादन भागीदार म्हणून स्थान बळकट केले. पर्यटन, जीवनशैली विकासात उल्लेखनीय योगदान देत कोल्हापूरच्या लौकिकात भर घालणाऱ्या प्रतिष्ठित ‘हायलँड क्लब’ची स्थापना आणि विकास केला.

त्यांच्या पश्चात आई राधामणी, पत्नी सुचेता, पुत्र आदित्य व अंशुल, बंधू सचिन, चुलत बंधू विजय मेनन, आप्तेष्ट असा परिवार आहे. रविवारी (दि. २२) सकाळी १०.३० वाजता कदमवाडीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघून कसबा बावडा स्मशानभूमीत त्‍यांच्‍यावर अंत्यसंस्कार होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT