वाशी : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशी (ता. करवीर) येथे निवडणूक भरारी पथकाने कारवाई करत 5 लाखांच्या किमतीच्या साड्यांचा साठा जप्त केला. जावळाच्या कार्यक्रमात मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याच्या संशयावरून कारवाई केली. टेम्पो व चालकाला ताब्यात घेतले आहे.
भरारी पथकाचे प्रमुख प्रवीण कोडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून, करवीर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. जप्त केलेल्या साड्यांचा साठा नेमका कोठून आला याचा तपास आता पोलिस करीत आहेत. दरम्यान, ज्यांच्या नावे साड्यांचे बिल आहे, त्यांनी ते सादर केले असून ते उमेदवार नसले तरी याची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करा, असा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.