house burglary Case  pudhari file photo
कोल्हापूर

House Burglary Case | कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कबनूर येथील बाळासो पाटीलनगरमध्ये दोघा भावांची घरे फोडली. यामध्ये सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान घडली. याची फिर्याद सागर आनंदा चौगले (वय ३५, रा. बाळासो पाटीलनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भरवस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

सागर चौगले आणि त्यांचे भाऊ अमोल चौगले यांची घरे शेजारी आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दोन्ही कुटुंबे बाहेरगावी गेली होती. चौगले कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सागर चौगले यांच्या घरातील तिजोरी उचकटून १२.५ ग्रॅमचे मंगळसूत्र, चार ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, तीन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, चांदीचे ब्रेसलेट आणि ९० हजार रुपये रोख, असा २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.र अमोल चौगले यांच्या घरातून सोन्याच्या रिंगा, डूल, दोन सोन्याचे मनगट आणि दोन हजार रुपये रोख, असा ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड आणि पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT