कोल्हापूर

व्ही. बी. पाटील लोकसभा लढविणार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी घेतला आहे. कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या वतीने पाटील यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.

सामान्य आणि प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी भक्कमपणे उभी राहील. नेत्यांच्या जवळचे म्हणून आतापर्यंत कार्यकर्त्यांना पदे दिली जात होती. परंतु, आता तसे होणार नाही. शरद पवार यांचे विचार घराघरांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

व्ही. बी. पाटील यांच्याकडे पाहत शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, पक्षाने आपल्याला काही दिले नाही, असे आपण कायम म्हणत असता. आता जिल्हाध्यक्ष आहात. त्यामुळे लोकसभा लढविणार की नाही, ते स्पष्ट करावे, असे आर. के. पोवार म्हणाले, यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

राष्ट्रवादी दक्षिण कोल्हापूरचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी निरंजन कदम, पिटर चौधरी, सुनीता कांबरे, सुनील देसाई यांची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी उपमहापौर संजय मोहिते, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील, निजामुद्दीन मुल्ला, शंकर भांबोरे, मारुती सुतार आदी उपस्थित होते. आभार सुरेंद्र माने यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT