कोल्हापूर

पस्तीस फूट लांबीचा प्रतापगड; चार फूट उंच रायगड

Arun Patil

कोल्हापूर : केवळ खेळ म्हणून किल्ले बनविणारे हात आता इतिहासाचा जागर करू लागले आहेत. किल्ल्याची रचना, बुरूज, तटबंदी, पिण्याचे पाणी, धान्याचे कोठार, तबेला, आरमाराचे महत्त्व या इतिहासातील गोष्टी अनेकजण अभ्यासू लागले आहेत. यातूनच कोल्हापुरात सुवर्णदुर्ग, रायगड, प्रतापगडच्या हुबेहूब प्रतिकृती साकारू लागल्या आहेत. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठेसह उपनगरांमध्ये हा इतिहास जागवला जात आहे.

गड-किल्ल्यांची माहिती, छायाचित्रे, नकाशे यांचा वापर करून प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. पंधरा दिवसांपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली होती.

चार फूट उंच रायगड

मंगळवार पेठेतील साठमारी फ—ेन्डस सर्कलने 20 चौरस फुटांमध्ये किल्ले रायगडची प्रतिकृती साकारली आहे. चार फूट उंच अशी ही प्रतिकृती पाहताना प्रत्यक्षात रायगडची सफर केल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. सध्या हा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

झुंजार क्लबचा सुवर्णदुर्ग

शिवाजी पेठेतील झुंजार क्लबने रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची प्रतिकृती साकारली आहे. गडाची तटबंदी, बुरूज, धान्याचे कोठार, तलाव बनविण्यात आला आहे. दहा चौरस फुटांतील या किल्ल्याची उंची अडीच ते तीन फूट आहे.

35 फूट लांबीचा प्रतापगड

पाचगावमधील ऋषीकेश कॉलनीत 35 फूट लांबीचा प्रतापगड उभारण्यात आला आहे. यासोबतच संध्यामठ तरुण मंडळ, शहीद भगतसिंग तरुण मंडळ, हिंदवी कॉलनी, बोंद्रेनगर, बापू ग्रुप, खंडोबा तालीम, उत्तरेश्वर पेठ, शाहूपुरी, राजारामपुरीसह उपनगरांत ठिकठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.

खेळाला इतिहासाची जोड

एका पिढीच्या हातून दुसर्‍या पिढीच्या हाती सुपूर्द करावे असे वैभव म्हणजे गड-किल्ले होय. माती, दगड, वीट, बुरूम, फरशीचे तुकडे अशा साहित्यातून गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणीचा खेळ सर्वांनीच लहानपणी खेळला आहे. बालचमूमधील ही आवड मोठ्या स्वरूपात तसेच अधिक अभ्यासपूर्ण दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT