कोल्हापुरात पावसाची हजेरी File Photo
कोल्हापूर

Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाची हजेरी

एकाच दिवशी धुके, ऊन अन्‌‍ पावसाची अनुभूती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात उन्हाचा तडाखा कायम असतानाच शनिवारी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. कमाल तापमान 37.1 अंशांवर होते. परिणामी, दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी अचनाक ढगाळ वातावरण झाले आणि दुपारी चारच्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाची रिपरिप सुरू होती. कुठे मध्यम, तर कुठे हलका पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग््राामीण भागाला मात्र पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी शनिवारी सकाळी धुके पडले होते. यामुळे सकाळी धुके, दुपारी ऊन आणि सायंकाळी पावसाची हजेरी असे तिहेरी वातावरण कोल्हापुरात पाहायला मिळाले.

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशात शनिवारी दुपारनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी मध्यम सरी झाल्या. जिल्ह्याच्या ग््राामीण भागातदेखील पावसाने हजेरी लावली.

उकाडा वाढला ः किमान तापमान 22.5 अंशांपर्यंत वाढल्याने सायंकाळनंतरदेखील उकाडा जाणवत आहे. पावसामुळे सापेक्ष आर्द्रतेत वाढ झाल्याने शनिवारी रात्री उकाडा अधिक जाणवत होता.

दोन दिवस पावसाचे अलर्ट

कोल्हापुरात आणखी दोन दिवस पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी (दि. 15) आकाश अंशतः ढगाळ असून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. 16) दुपारी किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT