गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोल्हापूरला येताना दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू File Photo
कोल्हापूर

Kolhapur News | गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोल्हापूरला येताना दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा/पाचगाव : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या पाचगाव (ता. करवीर) येथील दाम्पत्यावर काळाने घाला घातल्याने अर्ध्या रस्त्यातच अपघातात पतीचा जागीच मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली. कोल्हापूरच्या दिशेने येताना पुणे-बंगळूर महामार्गावर पारगाव खंडाळा बसस्थानकानजीक उड्डाणपुलावर ही भीषण दुर्घटना घडली.

यामध्ये दुचाकी महामार्गावर; मात्र पती-पत्नी ७० फूट खाली सेवा रस्त्यावर पडले. उपेंद्र नागेश चाटे (वय ४०, रा. दिंडेनगर, पाचगाव, जि. कोल्हापूर) असे मृत पतीचे नाव आहे, तर त्यांची पत्नी उन्नती चाटे या जखमी झाल्या आहेत. हे दोघेही पिंपरी-चिंचवड, आकुर्डी येथे हॉटेल व्यवसाय क्षेत्रात नोकरीला आहेत.

गणेशोत्सवामुळे ते शनिवारी दुचाकीवरून गावी येते होते. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते पारगाव खंडाळा बसस्थानकाशेजारी असणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलानजीक आले. त्यांची दुचाकी पुलाच्या बाजूच्या कठड्यास घासत गेली. त्यामुळे उपेंद्र यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यात ते तोल जाऊन पुलावरून खाली कोसळले.

दुचाकी महामार्गावरच; मात्र ते दोघेही सेवा रस्त्यावर सुमारे ७० फूट उंचीवरून पडल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. जखमी चाटे दाम्पत्याला नागरिकांनी तातडीने उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र पती नागेश चाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. चाटे कुटुंबीय पाचगावमध्ये गेले अनेक वर्षे राहत असून, या दाम्पत्याचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला आहे.

पाचगावमध्ये त्यांचे भाऊ, भावजय, आई, वडील राहतात. अन्य वाहनाने हुलकावणी दिल्याने अपघात चाटे दाम्पत्य हे रस्त्याच्या डाव्या बाजूने आपल्या दुचाकीवरून (एम.एच. ०९ जीटी १६४७) निघाले होते. रस्त्याच्या कडेने जात असताना महामार्गावरील इतर वाहनाने त्यांना हुलकावणी दिल्याने त्यांची गाडी बाजूच्या कठड्यास घासली. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT