Shivaji University | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे द्वितीय सत्र १८ नोव्हेंबरपासून सुरू 
कोल्हापूर

Shivaji University | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे द्वितीय सत्र १८ नोव्हेंबरपासून सुरू

विद्या परिषद बैठकीत निर्णय; शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. द्वितीय सत्राचा प्रारंभ १८ नोव्हेंबरपासून होणार असून ३१ मार्च २०२७ पर्यंत ते पूर्ण होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत.

विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यात विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.त्यानुसार परीक्षेबाबत विद्यापीठाच्या संलग्नता टी-१ विभागाने १३ नोव्हेंबर रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी, फार्मसी यांसह विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय सत्राच्या प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. परिपत्रकानुसार, बहुतांश पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम सत्र ११ जूनपासून सुरू झाले असून ५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शाखा आणि वर्षानुसार स्वतंत्र तारखा निश्चित केल्या आहेत.

सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयांना साप्ताहिक सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी सत्र सुरू करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, द्वितीय सत्र संपण्यापूर्वी सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा विभागांमार्फत नियोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेळापत्रकामुळे महाविद्यालयांना अध्यापन, अभ्यासक्रम पूर्णता आणि परीक्षा नियोजन करणे सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT