नितीन गडकरी 
कोल्हापूर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर

गगनबावडा-तळेरे मार्गाची हवाई पाहणी करणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : तळेरे-गगनबावडा महामार्गाची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी सोमवारी हवाई पाहणी करणार आहेत. यासाठी एक दिवसाच्या कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. यावेळी ते कागल-सातारा, कोल्हापूर-सांगली, नागपूर-रत्नागिरी महामार्गाचाही आढावा घेणार आहेत. दरम्यान, ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत.

सोमवारी गडकरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे चिपी विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते हेलिकॉप्टरने देवगडला रवाना होतील. यादरम्यान ते झाराप ते कणकवली दरम्यान महामार्गाची (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पॅकेज 9) पाहणी करतील. दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी ते देवगडहून इस्लामपूरकडे (जि. सांगली) हेलिकॉप्टरने रवाना होतील. या दरम्यान ते तळेरे ते गगनबाबवडा महामार्गाची (क्रमांक 566 अ) हवाई पाहणी करणार आहेत. इस्लामपूरहून सायंकाळी पाच वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर नागाळा पार्क येथील लॅबचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सायंकाळी सव्वासहा वाजता ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत कोल्हापूर विभागातील विविध कामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. विमानतळावर ही बैठक होईल. यानंतर सात वाजता ते विमानतळावरून मुंबईला रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT