Amit Shah  File photo
कोल्हापूर

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर

जवाहर कारखान्यातील 'ग्रीन एनर्जी' प्रकल्पाचे होणार भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा शनिवारी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. रविवारी हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यानंतर याच परिसरात शेतकरी मेळावा होणार आहे.

शनिवारी दुपारी एक वाजता त्यांचे हुबळी (जि. धारवाड) येथून विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. केंद्रीय शिक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी हे त्‍यांच्‍यासोबत असतील. यानंतर हे दाेन्‍ही नेते एकसंबा (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत. तेेथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी पाच वाजता गृहमंत्री शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजता ते हुपरीकडे रवाना होतील. सकाळी साडेअकरा वाजता महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यानंतर याच परिसरात शेतकरी मेळावा होणार आहे. दुपारी दोन वाजता ते कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT