kolhapur | एमडी विक्री : दोन तरुणांना शहरात अटक 
कोल्हापूर

kolhapur | एमडी विक्री : दोन तरुणांना शहरात अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून अटक केली. मंगळवार पेठ, सोमवार पेठ परिसरात केलेल्या दोन कारवायांमध्ये २४ ग्रॅम एमडीसह ६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

उमेर समीर मेस्त्री (२३, रा. सोमवार पेठ) याला भाऊसिंगजी रोडवरील बँकेजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८ ग्रॅम एमडी, दुचाकी असा सुमारे २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला; तर शोएब नौशाद शेख (२५, रा. सोमवार पेठ) याला मंगळवार पेठेतील शेळके उद्यान येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १५.२२ ग्रॅम एमडी, दुचाकी, मोबाईल असा सुमारे ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह अशोक पोवार, प्रवीण पाटील, अरविंद पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT