Road Safety Issue | शिये बावडा रस्त्यावरील विजेच्या खांबांमुळे पंधरा दिवसांत दोन बळी  Pudhari Photo
कोल्हापूर

Road Safety Issue | शिये बावडा रस्त्यावरील विजेच्या खांबांमुळे पंधरा दिवसांत दोन बळी

बांधकाम विभाग व महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Road Safety Issue

शिरोली एमआयडीसी : शिये फाटा ते बावडा पुलापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या मधोमध सुमारे वीसहून आधिक विजेचे खांब उभे आहेत. हे खांब वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत.

या मार्गावरील विजेचे खांब हालवण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत विज वितरण व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये समन्वयाचा अभाव आहे. या रस्त्यावर काही दिवसांत अनेक किरकोळ अपघात घडले आहेत त्यापैकी दोन मोठ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे . या अपघाताची गंभीर दखल घेण्याची शासनाच्या या विभागांना अद्यापही गरज वाटलेली दिसत नाही. या दोन अपघातानेही या दोन खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली दिसत नाही. आणखी किती बळी गेल्यानंतर या खात्याला जाग येणार? असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत.

शिये फाटा ते बावडा पुलापर्यतच्या रस्त्याचे रुंदीकरण करणे सुरू आहे. त्यासाठी सुमारे वीस कोटीचा निधी मंजूर आहे. शिये फाटा ते रॉकेट इंजिनिअरिंग जवळील विज उपकेंद्रापर्येत पहिला टप्पा आणि विज उपकेंद्रापासून बावडा पुलापर्यंत दुसरा टप्पा. अशा दोन टप्प्यात रस्त्याचे काम होत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे. मात्र या रस्त्यावर येणारे विजेचे खांब वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. शिरोली औद्योगिक वसाहतीतील विज वितरण विभाग, शिये विज वितरण विभाग, टोप विज वितरण विभागाच्या हद्दीत हे खांब येत असून. हे विजेचे खांब हालवण्यासाठी येणारा खर्च बांधकाम विभागाने करावा या करीता संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयातून याबाबतच्या खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर झाले नसल्याने विजेचे खांब हालवण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने विजवाहिण्याचे काम तसेच ठेवून रस्ते विकासाचे काम केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व विज वितरण विभाग यांच्यातील समन्वययाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याने रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विजेच्या खांबाला रात्री अपरात्री वाहन धडकून मोठे अपघात घडले आहेत. पण शासनाच्या या विभागांना अद्यापही जाग आलेली नाही. झालेल्या अपघातामुळे बळी गेलेल्या बदल संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT