Illegal Immigration | घुसखोरी करणाऱ्या दोन बांगला देशी नागरिकांना सक्तमजुरी  
कोल्हापूर

Illegal Immigration | घुसखोरी करणाऱ्या दोन बांगला देशी नागरिकांना सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या दोघा बांगला देशी नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक-२ व्ही. आर. उत्पात यांनी बुधवारी दोषी ठरवत ३ वर्षे ८ महिने सक्तमजुरी व १० हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले. १९ जानेवारी २०२३ मध्ये गांधीनगर येथील कोयना कॉलनीत ही कारवाई केली होती.

सोहेल कलाम मुल्ला ऊर्फ महम्म‍द इनामुल फकीर (वय ३३, रा. जिकरगाछा, जि. गोशुर, बांगला देश), सुमैया बादशाह मुल्ला (२६, रा. बडदे महाजन, जि. नोडाई, बांगला देश) अशी त्यांची नावे आहेत. २०२३ पासून हे दोघे गांधीनगरातील इंगवले यांच्या घरी ओळख लपवून पती-पत्नी म्हणून राहत होते. दोन बांगला देशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याच्या माहितीवरून गांधीनगर पोलिसांनी छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. विनापासपोर्ट भारतात त्यांनी घुसखोरी केल्याचे निष्पन्‍न झाले. पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील प्रतिभा जाधव यांचा युक्‍तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT