Fake doctor arrest | पन्हाळ्यात गर्भपाताच्या गोळ्या देणार्‍या बोगस डॉक्टरसह दोघांना बेड्या 
कोल्हापूर

Fake doctor arrest | पन्हाळ्यात गर्भपाताच्या गोळ्या देणार्‍या बोगस डॉक्टरसह दोघांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना थाटून बेकायदेशीररीत्या गर्भपाताच्या गोळ्या देणार्‍या ऋषीकेश रामचंद्र खोत (28, रा. खोतवाडी) या बोगस डॉक्टरसह त्याला औषधे पुरवणारा एजंट ऋषीकेश संजय माने (27, रा. हुपरी) या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आरोग्य विभागाने ही संयुक्त कारवाई केली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार पथकाने माजगाव येथील ‘श्री समर्थ क्लिनिक’वर बनावट रुग्ण पाठवून सापळा रचला. गर्भपाताच्या औषधांची मागणी केल्यावर खोतने 3 हजार रुपये घेऊन हुपरीच्या एजंटकडून औषधे मागवून घेतली. औषधे देतानाच पोलिसांनी छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT