कोल्हापूर

कोल्हापूर : गोवंश हत्याप्रकरणी दोघांना अटक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर गोवंश हत्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक करून मांस आणि रिक्षा जप्त केली. आसिफ मजिद बेपारी (वय 34, रा. बेपारी गल्ली), इस्माईल युसूफ मुजावर (58, रा. सदर बाजार, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक नंदकुमार पाटील (रा. रणदिवे गल्ली, कसबा बावडा) यांनी फिर्याद दाखल केली.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, गोवंश हत्येला मनाई असताना संशयित आसिफ बेपारीने रविवारी सकाळी राहत्या घरासमोर गोवंशाची बेकायदा कत्तल करून मांस विक्री करण्यासाठी इस्माईल मुजावर याच्या रिक्षातून वाहतूक करीत असताना महापालिका आरोग्य पथक आणि शाहूपुरी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. दोघांना ताब्यात घेऊन पथकाने मास व रिक्षा हस्तगत केली.

संशयिताविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता 429, 34 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियमाचे कलम 5,5 (ब) 5 (क) 6,7,9 (अ) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT