शिंगणापूर : येथील चोरीप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Bungalow Theft | बंद बंगल्यात पार्टी करून चोरी; दोघांना अटक

टीव्ही, शेगडीसह ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त; करवीर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील बंद बंगल्यात महिन्याभरापासून पार्टी करून त्याच बंगल्यातील प्रापंचिक साहित्य चोरणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली. प्रसाद अजित मिसाळ (वय १९, रा. शिंगणापूर, ता. करवीर), साहिल सचिन सोनुले (वय २२, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन टीव्ही, सिलिंडर, शेगडी असा सुमारे ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

शिंगणापुरातील शाकंभरी कॉलनीमध्ये कातवरे यांचा बंगला काही महिन्यांपासून बंद आहे. या बंगल्यात बाल्कनीतून प्रवेश करून काही तरुण पार्टी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, स्नॅकची पाकिटे, नशेची रिकामी इंजेक्शन आढळली होती. या तरुणांनीच घरातील प्रापंचिक साहित्याची चोरी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना अटक केली. त्यांनी चोरीचे साहित्य एका शेडमध्ये लपविल्याची कबुली दिली. पोलिस अंमलदार रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, अभिजित कांबळे, श्रीधर जाधव यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT