कोल्हापूर

तुकाराम मुंढे कोल्हापूरचे आयुक्त ही अफवा !

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याचे मेसेज शनिवारी व्हॉटस् अ‍ॅप जोरात फिरत होते. अनेकांनी त्याची पडताळणी न करताच मुंढे यांच्या फोटोखाली अभिनंदन असे लिहून पुन्हा मेसेज व्हायरल केले. त्यामुळे मुंढे यांच्या नियुक्तीची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. परंतू मुंढे यांची कोल्हापूरला नाही तर शासनाच्या मराठी भाषा सचिवपदी नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी चुकीचे मेसेज असून त्यासंदर्भात महापालिकेकडे कोणतेही आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले.

महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची पुण्याला बदली झाली आहे. त्यामुळे आयुक्तपदी कोण येणार? याबाबत शहरवासियांत उत्सुकता आहे. त्यातच राज्य शासनाने एकाचवेळी 20 आयएएस अधिकार्यांची बदली केली. त्यासंदर्भातील मेसेज नावांसह व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत होते. त्याचाच आधार घेऊन काहींनी मुंढे यांची कोल्हापूर आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे मेसेज व्हायरल केले. दुपारपासून रात्रीपर्यंत ही अफवा जोरात पसरली होती. त्यामुळे अनेकांनी त्या मेसेजचे स्टेटसही लावले होते. अखेर महापालिका अधिकार्यांनी ही अफवा असल्याचे फोन आणि व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT