शिरोली एमआयडीसी : शिरोली औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेच्या शेजारील महाराष्ट्र गॅरेज मध्ये लावलेल्या थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रकमधील गँस टाकीचा मोठा स्फोट झाला. व आग लागून ट़कने पेट घेतला ही घटना शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसरात घबराट पसरली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की महाराष्ट्र गॅरेज मध्ये थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रक लावण्यात आला होता. आज दुपारी गॅरेज मध्ये अचानकपणे दूर येऊ लागला काही वेळात मोठा स्फोट झाला. या स्फोटात ट्रक व गॅरेजमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. गॅरेज मध्ये कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. त्यामुळे मोठ्ठा अनर्थ टळला. दरम्यान आग विझवल्यानंतरपाहणी केली असता एक गॅस सिलेंडरचा पण स्फोट झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेची नोंद सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत शिरोली पोलिसात झाली असून प्रत्यक्ष आग विझवण्यासाठी सपोनी सुनील गायकवाड व पोलीसांनी हिरीरीने सहभाग घेतला.नेमका स्फोट कशाने झाला अशी माहिती उपलब्ध झाली नाही.