कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना कुलपती डॉ. संजय डी. पाटील. समवेत विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आदी. 
कोल्हापूर

Dr. D. Y. Patil Birth Anniversary | डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे प्रतिमापूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात कुलपती तथा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, साळोखेनगरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम व विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदेच्या वतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ येथे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. आर. पावसकर, प्रा. डी. एन. शेलार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT