Doctor Dies Road Accident | दुचाकीला दुचाकी धडकली; डॉक्टरचा मृत्यू 
कोल्हापूर

Doctor Dies Road Accident | दुचाकीला दुचाकी धडकली; डॉक्टरचा मृत्यू

गारगोटी-पाटगाव मार्गावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : गारगोटी-पाटगाव मार्गावर गारगोटी येथील गणेश मंदिरानजीक झालेल्या भीषण अपघातात आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक डॉ. उत्तम पांडुरंग शेणवी (५५, रा. आकुर्डे, ता. भुदरगड) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी चालक सदानंद रामा जाधव (मूळ रा. कबनूर, इचलकरंजी; सध्या उत्तूर, ता. आजरा) याच्या विरुद्ध भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदानंद जाधव याने भरधाव दुचाकी चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील डॉ. शेणवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत श्रीकांत श्रीपती शेणवी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शहाबाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. डॉ. शेणवी यांच्या अकाली निधनामुळे आकुर्डेसह संपूर्ण भुदरगड तालुक्यात हळहळ व्यक्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT