Kolhapur Road Accident | कूर येथे अपघातात कोल्हापूरचा एक ठार Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Road Accident | कूर येथे अपघातात कोल्हापूरचा एक ठार

ट्रकची मोटारसायकलला जोराची धडक

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : कोल्हापूर-गारगोटी मुख्य रस्त्यावर कूर-मुदाळ (ता. भुदरगड) दरम्यान ट्रकने दुचाकीस्वारास पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मितेश रवींद्र टेंबे (वय 41, रा. राजारामपुरी 10 गल्ली, कोल्हापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी ट्रकचालक संजय राजाराम देसाई (रा. नाधवडे, ता. भुदरगड) याच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. मुदाळकडून गारगोटीकडे टाटा ट्रक (एम. एच. 11 ए. एल.7507) धावत असताना कूर कालव्यानजीक मितेश टेंबे यांच्या दुचाकी (एम. एच. 09 जी. जी. 8264) ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने य टेंबे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गौरव सूर्यकांत कुलकर्णी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे, हेड कॉन्स्टेबल गवळी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT