कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, ‘रेवहेड यामाहा’चे सुमित दतवाडे, अर्चना दतवाडे, दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, ‘अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर’चे सुशील अग्रवाल. 
कोल्हापूर

Kolhapur women bike rally | पारंपारिक वेशभूषेत रणरागिणींचा कोल्हापुरात बाईक रॅलीतून जल्लोष

कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव यांनी रॅलीचे नेतृत्व करत केला शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात रविवारी ‘स्त्री शक्ती’चा अभूतपूर्व सोहळा रंगला. दैनिक ‘पुढारी’, 94.3 टोमॅटो एफ.एम., पुढारी न्यूज आणि कस्तुरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महिला बाईक रॅलीने अवघे कोल्हापूर शहर दणाणून सोडले. महिलांनी नऊवारी साडी, फेटा आणि हातात बुलेटचे हँडल धरून ‘आम्ही कुठेच कमी नाही’ असा संदेश दिला.

या रॅलीचा शुभारंभ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव आणि कोल्हापूर महानगरपालिका महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा कौसर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पवार, विभागीय व्यवस्थापक (स्पेशल इनिशिएटिव्ह) बाळासाहेब नागरगोजे, वरिष्ठ इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, कस्तुरी क्लब ग्रुप हेड (महाराष्ट्र) मयुर तांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या रॅलीचे मुख्य प्रायोजक ‘अदानी समूह’ होते. ‘रेवहेड यामाहा’चे सुमित व अर्चना दतवाडे, ‘अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर’चे सुशील आगरवाल, ‘मोहिनी पैठणी’च्या मोहिनी वणकुंद्रे आणि ‘हिराकांत पाटील (कझ) ग्रुप’ यांनी या उपक्रमाला मोलाचे सहकार्य दिले.

सोनाली गवळी यांनी जिंकली पैठणी

लकी ड्रॉद्वारे काढण्यात आलेल्या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस सोनाली अमर गवळी यांनी जिंकले. ‘अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर’तर्फे सर्व सहभागी महिलांना हमखास भेट म्हणून मोत्याच्या कुड्यांचे कुपन देण्यात आले असून, 16 ते 30 मार्चदरम्यान हे गिफ्ट घेण्याचे आवाहन सुशील अग्रवाल यांनी केले. विशेष म्हणजे, रॅलीत सहभागी झालेल्या यामाहाच्या गाड्यांना वर्षभर मोफत सर्व्हिसिंग देण्याची घोषणा ‘रेवहेड यामाहा’तर्फे करण्यात आली.

मेकॅनिक्स असोसिएशनचे सहकार्य

रॅलीदरम्यान दुचाकी दुरुस्तीची मोफत सेवा पुरवणार्‍या ‘टू-व्हीलर मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशन’च्या टीमचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये संजय पाटणकर, वैभव पाटणकर, प्रशांत साळोखे, प्रवीण देवकर, विष्णू कुंभार, संदीप कदम, कृष्णात पाटील, राजू मंडलिक, विजय कदम, अभी पोवार यांनी तांत्रिक देखभाल दुरुस्ती सेवा पुरवली. रॅलीच्या सांगतेनंतर महिलांनी गाण्यांच्या तालावर मनसोक्त नृत्य करत जल्लोष केला. एकमेकींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत या चैतन्यमय सोहळ्याची सांगता झाली.

चला स्त्री शक्तीचा जयघोष करूया : डॉ. स्मितादेवी जाधव

कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी स्वतः दुचाकी चालवत या भव्य रॅलीचा शुभारंभ केला. त्यांच्या उपस्थितीने कस्तुरी सदस्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला. रॅलीपूर्वी डॉ. जाधव यांनी अनेक महिलांशी संवाद साधला, यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली. शुभारंभापूर्वी बोलताना त्या म्हणाल्या, ‘महिलांवर घरातील अनेक जबाबदार्‍या असतात. या सर्व जबाबदार्‍या काही काळासाठी विसरून महिलांनी आज

स्वतःसाठी हा खास वेळ काढला आहे. महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवे. बाईक रॅलीसारख्या उपक्रमांमुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढतो. हाच कस्तुरी क्लबच्या विविध उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग, जल्लोषात सहभागी होऊया आणि स्त्री शक्तीचा जयघोष करूया!’ डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या या प्रोत्साहनामुळे रॅलीतील वातावरण अधिकच चैतन्यमय बनले.

नऊवारीचा साज आणि बुलेटचा रुबाब

सकाळी 7 वाजल्यापासूनच महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कोल्हापुरी फेटा, डोळ्यांवर गॉगल आणि कपाळी चंद्रकोर अशा रुबाबदार वेशभूषेत महिलांनी सेल्फीचा आनंद लुटला. रॅलीच्या मार्गावर वाहतूक पोलिस आणि पायलट रॅलीचे चोख नियोजन होते. दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंप, ताराराणी चौक, महाद्वार रोडमार्गे पुन्हा दसरा चौक अशा मार्गावर ही रॅली काढण्यात आली.

सासू-सून, माय-लेकी, नणंद- भावजय अन् मैत्रीणीही

बाईक रॅलीत सहभागी झालेल्या महिलांपैकी कुणी एकमेकींच्या नात्याने माय-लेकी होत्या, तर कुणी सासू-सून. नणंद-भावजय, तर कुणी जावा-जावा...रोजच्या जबाबदार्‍या, कर्तव्ये यांना थोडासा विसावा देत बाईक रॅलीच्या निमित्ताने प्रत्येकीने निखळ आनंद मिळवला. वय विसरून सगळ्याजणी दिलखुलास नाचत होत्या. एकमेकींसोबत फोटो काढत होत्या. सोशल मीडियावर रिल्स करण्यात रममाण झाल्या होत्या. पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ते सत्तरीच्या आजीपर्यंत प्रत्येकीचा उत्साह टिपेला पोहोचला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT