कोल्हापूर : आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते, तर प्रभावी संवाद कौशल्य, क्रिएटिव्ह विचार आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची कला अत्यंत महत्त्वाची ठरते. याच व्यावसायिक गोष्टींचे थेट प्रशिक्षण देण्यासाठी शहरातील लोकप्रिय वाहिनी ‘94.3 Tomato FM 15 वर्षांवरील सर्वांसाठी 10 दिवसांच्या खास ‘आरजे व व्हॉईस आर्टिस्ट वर्कशॉप’चे आयोजन केले आहे. हे वर्कशॉप दि. 6 जून ते 15 जून 2026 या कालावधीत होणार आहे.
या 10 दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींना Voice Culture, Voice Modulation, RJ Talk, Advertisement Writing, Voice Over Techniques आणि Creative Thinking अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष (Practical) प्रशिक्षण दिले जाणार आहे. रेडिओ, सोशल मीडिया, पॉडकास्टिंग, अँकरिंग, कंटेंट क्रिएशन आणि व्हॉईस इंडस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणार्या तरुणांसाठी आणि हौशी नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
अनेकांच्या मनात ‘माझा आवाज चांगला नाही’ किंवा ‘मी लोकांसमोर प्रभावीपणे बोलू शकत नाही’, अशी भीती असते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव मिळाला, तर कोणतीही व्यक्ती एक उत्तम वक्ता आणि सादरकर्ता बनू शकते. हेच लक्षात घेऊन या वर्कशॉपमध्ये केवळ आवाजाच्या तांत्रिक बाजूंवरच नव्हे, तर प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास वाढवणे, सादरीकरण कौशल्य (Presentation Skills) सुधारणे आणि क्रिएटिव्हिटी विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या वर्कशॉपची फी फक्त रु. 3,000/- असून, प्रवेशासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 पर्यंत असणार आहे. कार्यशाळेसाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन टोमॅटो एफएमतर्फे करण्यात आले आहे.
प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क
टोमॅटो एफएम, वसंत प्लाझा, 5 वा मजला, आयसीआयसीआय बँक बिल्डिंग, कोल्हापूर. संपर्क : 8600229183.