समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी नाती घट्ट करा - ॲड. कल्पना माने Pudhari Photo
कोल्हापूर

समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी नाती घट्ट करा - ॲड. कल्पना माने

अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये "नवसंवाद २०२४" व्याख्यानमालेचे गुंफले पुष्प

पुढारी वृत्तसेवा

किणी : "नारी एक ऊर्जा स्त्रोत आहे. तिने कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावणे अपेक्षित आहे. समाजव्यवस्थेत वावरताना चुकीच्या गोष्टींना प्रतिकार करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, याची जाणीव मुलींना असायला पाहिजे. समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी नाती घट्ट असणे आवश्यक आहे, प्रसंगी तडजोडही करता आली पाहिजे. स्वतःला आर्थिक आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी प्रयत्नवादी राहा." असे प्रतिपादन ॲड. कल्पना माने-पाटील यांनी केले. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये "नवसंवाद २०२४ सन्मान नारी शक्तीचा.. जागर विचारांचा.." या नवरात्रीनिमित्त आयोजित अनोख्या व्याख्यानमालेतंर्गत "महिलांविषयक कायदे आणि सुरक्षितता" या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांविषयक कायद्यांचीही सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी केले. महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये नवरात्री उत्सवानिमित्त नवनवीन विचार पेरण्यासाठीच नवसंवादाचे आयोजन केल्याचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी सांगितले. यावेळी डीन ॲकॅडमीक्स डॉ. सौ. एस. एस. पाटील, डीन स्टुडंट अफेयर्स डॉ. जे. एम. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख व आयसीसीच्या चेअरमन प्रा. सौ. एस. एच. शेटे, एमबीएचे प्र-संचालक डॉ. सागर सुतार, प्रा. सौ. एस. व्ही. सागावकर आदी उपस्थित होते. यावेळी ई अँड टीसी, सिव्हील, इलेक्ट्रिकल व एमबीए विभागाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT