कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरोली एमआयडीसी येथे बिबट्याच्या कातडीची अवैध वाहतूक सुरू असताना कारवाई करून वन विभागाने दोन वाघांचे कातडे जप्त केले. 29 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वन विभाग अधिकार्यांनी कोल्हापूरसह रत्नागिरी येथे ठिकठिकाणी कारवाई करून 11 जणांना अटक केली.
पांडू तात्या शिंदे (रा. मसुचीवाडी, इस्लामपूरजवळ) व शिवाजी सकपाळ (रा. पळशी, जि. सातारा) पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी नसरुद्दीन हबीब शेख (रा. चाकूर, जि. लातूर), समीर तातू तेजम (रा. माणगाव गोठोस, ता. कुडाळ), विजय विष्णू जमदाडे (रा. गोडोली, जि. सातारा), राकेश रमेश बांदेकर (रा. माणगाव गोठोस, ता. कुडाळ) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अधिक तपास करून शैलेश रघुनाथ इंदुलकर (रा. खेड, जि. रत्नागिरी), शिवाजी शंकर सपकाळ (रा. पळशी), जीवन भगवान तेजम (रा. चाफेली, ता. कुडाळ), रवी भगवान तेजम (रा. चाफेली, ता. कुडाळ), ईश्वरा चंदू नांगरे-पाटील ऊर्फ पांडू तात्या (रा. मसुचीवाडी), गजानन कृष्णा हळदे (रा. देवखिरकी, ता. गुहागर), पांडुरंग अंबाजी जाधव (रा. हेदवी, ता. गुहाघर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.