Road Accident | कंटेनरमध्ये वायर अडकून तीन सिग्नल पडले 
कोल्हापूर

Road Accident | कंटेनरमध्ये वायर अडकून तीन सिग्नल पडले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कंटेनरमधील स्क्रिन मशिनमध्ये सिग्नलच्या वायर अडकून अपघात झाल्याने ताराराणी पुतळ्यानजीकचे तीन सिग्नल शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पडले. पोलिसांनी चालक विजयकुमार अजयकुमार सिंग (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) याला कंटेनरसह ताब्यात घेतले. या घटनेमध्ये १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

शुक्रवारी (दि. १०) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कंटेनर स्क्रिन मशिनची वाहतूक करत होता. टेंबलाईवाडी उड्डाणपुलाकडून ताराराणी चौकमार्गे तावडे हॉटेलकडे जात असताना ताराराणी चौकात कंटेनर आला असता मशिनमध्ये सिग्नलच्या दोन वायर अडकल्या. चालकाच्या निदर्शनास ही बाब आली नसल्यामुळे त्याने कंटेनर पुढे नेला. यामुळे चौकातील तीन सिग्नल खाली कोसळले. यामुळे झालेल्या आवाजामुळे चालक जागीच थांबला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गस्तीवर असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंटेनरसह चालक विजयकुमार सिंग याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रात्री उशिरा सिग्नल पूर्ववत

सिग्नलच्या वायर मशिनमध्ये अडकल्यामुळे तीन सिग्नल रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी पहाटेच या तीनही सिग्नलभोवती बॅरीकेट्स लावून बंदिस्त केले. रात्री उशिरापर्यंत सिग्नल पूर्ववत करण्याचे काम सुरु होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT