कोल्हापूर

आराम बस उलटून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Arun Patil

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : पणजीहून मुंबईकडे निघालेली भरधाव आराम बस नियंत्रण सुटल्याने पिरवाडीजवळ रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात पुणे येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, मृतांत आईसह दोन लेकरांचा समावेश आहे.

फिर्यादी विराट विठ्ठललाल गौतम (रा. मांजरी बु., ता. हवेली, जि. पुणे) हे गोवा येथून आराम बसने (एम.एच. 12 टीव्ही 1658) कुटुंबासह मुंबईकडे निघाले होते. कोल्हापूर-राधानगरी रोडवर बुधवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास पिरवाडीजवळच्या एका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे आराम बस रस्त्यावर उलटली. या अपघातात फिर्यादी यांची पत्नी सौ. नीलू विराट गौतम (वय 48), मुलगी कु. रिद्धिमा (17), कु. सार्थक (13) यांचा मृत्यू झाला. तसेच नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौतम यांनी चालक निरंजनय्या बसय्या हिरेमठ (29, रा. लिंगापूर, जि. बागलकोट, कर्नाटक) याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT