Sugarcane Price Issue | ऊसदरप्रश्‍नी तीन तास बंद दाराआड चर्चा; उत्सुकता, हुरहुर अन्‌ संताप! 
कोल्हापूर

Sugarcane Price Issue | ऊसदरप्रश्‍नी तीन तास बंद दाराआड चर्चा; उत्सुकता, हुरहुर अन्‌ संताप!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा झाली. तोडग्याची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याने उपस्थित शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये उत्सुकता आणि हुरहुर शिगेला पोहोचली होती. मात्र, चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, काही कारखानदारांशी चर्चा करून प्रतिटन ३,९०० रुपये एकरकमी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हंगाम संपल्यानंतर आणखी १०० आणि साखर प्रतिक्विंटल ४,२०० रुपयांना विकली गेल्यास पुन्हा २०० रुपये देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले. हा प्रस्ताव मान्य करून दिवाळीत नागरिकांचे हाल करण्याऐवजी आंदोलन मागे घ्यावे.यावेळी प्रा. जालिंदर पाटील बंडू पाटील, अजित पोवार, शिवाजी माने, राजेंद्र गड्ड्याण्णावर, सावकर मादनाईक, भगवान काटे, रूपेश पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT