Two-Wheeler Theft | झटपट कमाईसाठी दुचाकींची चोरी; तिघांना अटक 
कोल्हापूर

Two-Wheeler Theft | झटपट कमाईसाठी दुचाकींची चोरी; तिघांना अटक

राजारामपुरी पोलिसांची कारवाई : सात दुचाकींसह, तीन मोबाईल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कमीत कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून शहरातील चोरीच्या सात दुचाकी, तीन मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. संशयित सत्यनारायण ऊर्फ यश हिराकांत डावाळे (वय २१), साहिल शब्बीर शेख (२८) व पृथ्वीराज सुनील लाखे (२२, तिघे रा. यादवनगर) अशी नावे आहेत.

चोरीतील एक दुचाकी विकण्यासाठी साहिल शेख शेंडा पार्क परिसरात येणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता पृथ्वीराज, सत्यनारायण यांच्या मदतीने सात दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. सायबर चौक, टाकाळा, राजारामपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या पाच दुचाकींचे मालक शोधले असून, दुचाकींच्या मालकांचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, मिलिंद बांगर, शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, गजानन हराळे, सचिन पाटील, दिगंबर कुंभार, राहुल कदम, सचिन वायदंडे, सूरज भोपळे यांनी ही कारवाई केली.

वाहनांच्या नंबरप्लेटच बदलल्या

संशयितांनी गर्दीच्या ठिकाणी दुचाकींची चोरी करण्याचा फंडा अवलंबला होता. चोरीतील काही वाहनांच्या नंबरप्लेट परस्पर बदलल्याची कबुली संशयितांनी दिली. वाहनांची चोरी भरदिवसाच केल्याचेही निष्पन्न झाले. संशयित सेंट्रिंग कामे, स्क्रॅप गोळा करण्याची कामे करतात. या कामासोबत जादा कमाईसाठी दुचाकी चोरण्याचा फंडा अवलंबला होता. चोरीतील तीन दुचाकी स्वतःच वापरत होते. साहिल शेखवर मारामारीचा आणि मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT