तारदाळ (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : तारदाळमध्ये प्रथमच तिसऱ्या आघाडीमुळे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. आज सकाळी उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला असून दुपारी दोन पर्यंत 45 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे महिलावर्ग मोठ्या उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत.
सरपंच पदासह एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी तिरंगी तर सदस्यांच्या 17 जागांसाठी 51 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दुपारपर्यंत मतदान शांततेत सुरू होते. तिसऱ्या आघाडीचे माध्यमातून युवावर्गाने प्रस्थापित्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
हेही वाचा :