Thieves broke 5 shops in Takwade File Photo
कोल्हापूर

टाकवडेत चोरट्यांनी ५ दुकाने फोडली

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण/पुढारी वृत्तसेवा :

टाकवडे (ता.शिरोळ) येथील मुख्य चौकातील शिवकृपा मेडिकल, ऋतुजा मेडिकल, आनंदी किराणा दुकान, अल्ताफ पान शॉप, जगताप सोडा सेंटर या ५ दुकानांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी आज (बुधवार) रात्री ती फोडली. शिरढोणनंतर टाकवडे येथेही दुकान फोडीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बंद दुकानात छतावरून उतरून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

राजर्षी शाहू महाराज चौक, टाकवडे हा खूप गजबजलेला वर्दळीचा आणि महत्वाचा मार्ग मानला जातो. येथील व्यावसायिकांची दुकाने फोडून चोरट्यांनी एक मोठे आव्हानच तपास यंत्रणेला दिले आहे. या चोरीमुळे टाकवडेतील ग्रामस्थ खूपच घाबरले आहेत.

दरम्यान वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने या चोरीचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे द्यावा, जेणेकरुन खरे चोर हाताला लागतील आणि याचा परिणाम पुन्हा गावात चोरी करण्याचे धाडस होणार नाही. सध्या तरी या चोरीच्या प्रकरणामुळे टाकवडे येथील ग्रामस्थ घाबरलेले दिसत आहेत. या विभागात सीसीटीव्ही आहे, यात जे चित्रीकरण झाले आहे त्यामध्ये कर्नाटक पासिंगची गाडी दिसून येते. चोरीचा तपास वेगात व्हावा, अशी लोकांची अपेक्षा आहे.

चोरट्यांच्या हाताला फक्त चिल्लर

एकाच चौकातील ५ दुकाने फोडण्याचा चोरट्याने प्रयन्त केला. मात्र यापैकी तीनच दुकानात त्यांना प्रवेश करता आला. यामध्ये त्याच्या हाताला किरकोळ चिल्लरच लागली. झाडावर चढून छत उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. एक चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. शिरोळ पोलिसांकडून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT