Thermal drone watch | जंगलात वन विभागाचा थर्मल ड्रोन वॉच; चार शिकार्‍यांना पकडले 
कोल्हापूर

Thermal drone watch | जंगलात वन विभागाचा थर्मल ड्रोन वॉच; चार शिकार्‍यांना पकडले

चंदगड, पाटणे, गारगोटी, आजरा आणि कडगाव परिक्षेत्रात 280 ट्रॅप कॅमेरे कार्यरत; गगनबावडा, पन्हाळा, पेंडाखळे येथे ट्रॅप कॅमेरे लावणार

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्यप्राण्यांची सुरक्षा आणि शिकारी रोखण्यासाठी वन विभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. वन विभागाच्या थर्मल ड्रोनच्या मदतीने चार शिकार्‍यांना पकडण्यात यश आले असून, याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ शिकारीच नव्हे तर मानवी वस्तीत शिरणार्‍या बिबट्या आणि हत्तींना हुसकावण्यासाठी तसेच त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हे थर्मल कॅमेरे अत्यंत प्रभावी ठरत आहेत. याशिवाय सध्या कोल्हापूर वन विभागाच्या ताफ्यात 317 ट्रॅप कॅमेरे असून त्यापैकी 280 कॅमेरे प्रत्यक्ष कार्यरत आहेत.

ट्रॅप कॅमेरे प्रामुख्याने चंदगड, पाटणे, गारगोटी, आजरा आणि कडगाव या परिक्षेत्रात बसवण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची गणना केली जात असून, 31 मार्चपासून या सर्व कॅमेर्‍यांमधील डेटा संकलित केला जात आहे.

लवकरच येथे लावण्यात येणार कॅमेरे

गगनबावडा, पन्हाळा, पेंडाखळे या परिक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सध्या कॅमेरे कमी पडत आहेत जर आणखी मिळाल्यानंतर तर संपूर्ण तालुक्यात लावण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

ड्रोनमधील सेन्सर्ट टिपतात उष्णता

थर्मल ड्रोनमध्ये उष्णता शोधणारे (इनफ्रारेड) सेन्सर्स असतात. जे अंधारात किंवा झाडाझुडपांत लपलेल्या सजीव प्राण्यांच्या शरीराची उष्णता ओळखून त्यांची प्रतिमा स्पष्टपणे टिपू शकतात.

वाघांच्या हालचाली टिपताहेत ट्रॅप कॅमेरे

विशेषतः वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत. 4 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात या कॅमेर्‍यांची एक जोडी लावून प्राण्यांच्या अधिवासाची माहिती घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT