कोल्हापूर

देवगड : कट्टा येथील वळण बनतेय मृत्यूचा सापळा; दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान

Shambhuraj Pachindre

देवगड; पुढारी वृत्तसेवा : देवगड कट्टा येथे आज (दि.21) सातच्या सुमारास कट्टा येथील धोकादायक वळणावर दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गड्याचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई येथील समीर रघुनाथ जाधव आपले (वाहन क्र. MH 01 DE 4212) वाहनाने देवगड येथे फिरण्यासाठी आले होते. देवगडहून ते सावंतवाडी येथे जात असताना कट्टा येथील धोकादायक वळणावर देवगडच्या दिशेने येणाऱ्या राधानगरी येथील भिकाजी कलाप्पा डवर (वाहन क्र. MH 09 EM 0122) हे आपल्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने देवगडकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून समोरा-समोर धडक झाली. या अपघात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. डवर यांच्या वाहनातील अन्य सहकारी मात्र पसार झाले आहेत. या वाहनातील प्रवाशांनी मद्य प्राशन केले होते. त्यामुळे गाडीतून प्रचंड दुर्गंधी येत होती.

अपघाताची माहिती मिळताच, देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम, विजय बिर्जे, विशाल वैजल,यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला, या अपघातातील भिकाजी डवर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच धोकादायक वळणावर १२ मे रोजी रिक्षा आणि चारचाकी गाडीमध्ये भीषण अपघात होऊन रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. आज याच वळणावर २१ मे रोजी पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात जीवित हानी झालेली नाही. मात्र, या वळणावर दोन्ही बाजूने गतिरोधक बसविण्यात यावे . अशी मागणी जोर धरू लागली आहे.

SCROLL FOR NEXT