कोल्हापूर

कोल्हापूर : हुपरीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; पालकमंत्री

backup backup

हुपरी; अमजद नदाफ : संपूर्ण भारतात चांदी दागिन्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारणे, चांदी क्लस्टर आदीसाठी अग्रक्रम राहिल असे सांगत येथील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहु असे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यानी बोलताना दिले.

हुपरीच्या वादग्रस्त विकास आराखड्यासंदर्भात, तसेच जादा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासनही त्यानी दिले. हुपरी  नगरपरिषदेची विकास आढावा बैठक पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावर आदींच्या  उपस्थितीत पार पडली.पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी विविध कामाचे तसेच भविष्यातील विकासकामाचे सादरीकरण केले .

यावेळी नागरिकांनी विविध विकासकामाबाबत आग्रह धरला . छत्रपती शिवाजी महाराज यांचा  आश्वारूढ  पुतळा उभा करण्यासंदर्भात, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  पुतळा परिसरात चैत्यभूमी परिसर विकासासाठी  निधी,  ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राला जागा उपलब्ध करुन द्यावी, मराठा आरक्षण तातडीने जाहीर करावे , सूर्या तलावामध्ये शिवसृष्टी उभा करण्यासंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल उभा करणे, इंदुमती राणी सरकार बेघरसघं यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल बांधून देणे, नगरपरिषद कर्मचाऱ्याचे समावेशन, नगरपालिकाची इमारत उभा करण्यासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देणे, सूळकुड पाणी योजनेची 47 कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यासंदर्भात तसेच ग्रामीण रुग्णालय आदी विषय मांडण्यात आले.

यावेळी शिवसेना शिंदे गट  जिल्हाप्रमुख रवींद्र माने , माजी नगराध्यक्ष जयश्री गाट, शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख अजित सुतार, मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील, हुपरी शहराध्यक्ष नितीन गायकवाड,किरणराव काबंळे,जनता सहकार समूहाचे आण्णासाहेब  शेडूंरे, माजी सरपंच दिनकरराव ससे, विद्याधर काबंळे, धर्मवीर कांबळे, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, मराठा समाज अध्यक्ष रविशंकर चिटणीस, सुदर्शन खाडे, सुरेश इंग्रोळे, राजाराम देसाई, मोहनराव वाईगंडे, अजित  उगळे, सतिश निकम, अशोकराव बल्लोळे, अमित नरके, वीरकुमार शेंडुरे, राजेंद्र साळुंखे, योगेश कंळत्रे, काॅ.राजेंद्र शिंदे नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. रामचंद्र मुधाळे यानी सूत्रसंचालन केले .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT