कोल्हापूर

Narsinhwadi : नृसिंहवाडीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न

backup backup

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज (दि. १९) पहाटे साडे सहा वाजता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम अवतार असल्याने या जन्मकाळास विशेष महत्व आहे.

जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानचे वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज मंदिरात पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झालेनंतर येथील परंपरेप्रमाणे सुर्योदयी समयी साडे सहा वाजता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिलीपशास्त्री उपाध्ये यांनी पुराण झाले. जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या पाळण्यावर अबिर गुलाल व फुलांची उधळण केली. मानकरी मेघशाम पुजारी यानी श्रींंची विधिवत पूजा केली. ब्रम्हवृंदांनी पाळण्याचे पठण केले. महिलांनी मोठ्या भक्तीने श्रींचा पाळण्यास आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आला. श्री दत्त देव संस्थानच्या सहकार्याने पुजारी परिवाराने महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT