कोपार्डे : अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. 
कोल्हापूर

Kolhapur Gaganbawda road accident |कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेम्पोने 2 दुचाकीस्वारांना उडवले

पुढारी वृत्तसेवा

कोपार्डे : कोल्हापूर - गगनबावडा महामार्गावर वाकरे फाटा ( ता. करवीर) ते दोनवडे फाटादरम्यान दोन कि.मी. अंतरावर टेम्पोने दोन दुचाकींना धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केले. प्रदीप मधुकर पाटील (वय 30, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) व रमेश श्रीपती पाटील (36, रा. वाघोबाचीवाडी, ता. करवीर) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. टेंपोचालक ओमकार लक्ष्मण सोनाळकर (वय 45, रा. वाकरे, ता. करवीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक ओमकार सोनाळकर हा कोपार्डे बाजारातून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. यावेळी त्याच्या टेम्पोने विठाई चंद्राई हॉलच्या समोर एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर भेदरलेल्या चालकाने टेम्पो न थांबवता तसाच पुढे दामटला आणि काही अंतरावर गेल्यावर दुसर्‍या दुचाकीला वाकरे फाट्यावर धडक दिली. तिथेही न थांबता टेम्पो सुमारे दोन किलोमीटर पुढे नेऊन बालिंगा पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मुरूम टाकलेल्या भरावावर नेऊन अखेर त्याने थांबवला. नागरिकांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलीस दाखल झाले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत चालकाची तपासणी सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT