Tawade Hotel Encroachment | तावडे हॉटेल परिसरातील ८८ अतिक्रमणांवर सोमवारी बुलडोझर  
कोल्हापूर

Tawade Hotel Encroachment | तावडे हॉटेल परिसरातील ८८ अतिक्रमणांवर सोमवारी बुलडोझर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील ११६ मिळकतींवर २५ जूनपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्किट बेंचने दिले आहेत. मात्र, उर्वरित ८८ मिळकतींबाबत न्यायालयाचे कोणतेही आदेश नाहीत. परिणामी, २० जून रोजी अंतिम नोटिसीची मुदत संपत असल्याने सोमवारी (दि. २२) महापालिका त्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवणार आहे.

तावडे हॉटेल परिसरातील उचगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी दिला आहे. संबंधित बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी सर्किट बेंचमध्ये त्या नोटिसांना आव्हान दिले होते. ७ मे रोजी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू करून १ जून रोजी अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसांवर ११६ मिळकतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील अंतिम सुनावणी २५ जून रोजी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT