kolhapur | राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा साळोखे, तर कुलपती सुवर्णपदक वेदिका कदम यांना जाहीर 
कोल्हापूर

kolhapur | राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा साळोखे, तर कुलपती सुवर्णपदक वेदिका कदम यांना जाहीर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सभारंभात शिवाजी विद्यापीठातील एमबीए विभागाची विद्यार्थिनी तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती पदक, तर वाळवा तालुक्यातील इस्लामपूर (जि. सांगली) येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील एम. ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल वेदिका कदम यांना कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती सुवर्णपदक शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र व एनसीसी, एनएसएसमधील गुणवत्ता तसेच व्यक्तिमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्व गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल प्रदान केले जाते. दीक्षान्त समारंभातील ही दोन्ही महत्त्वाच्या पदांवर मुलींनी नाव कोरले आहे. दरम्यान, तनुजा व वेदिका यांच्यावर विद्यापीठ वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थी वयातच कौशल्य आणि संधी यांचे सोनं करा

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना तनुजा साळोखे म्हणाल्या, विद्यार्थीदशेत अभ्यासक्रमाबरोबरच शाळा, कॉलेज, विद्यापीठात अनेक उपक्रम राबवले जात असतात. हे केवळ उपक्रम नसून कौशल्य आत्मसात करण्याची संधी असते. ती दवडू नका. त्यातून मिळणारा आत्मविश्वास व्यक्तिमत्त्व घडवतो. हे पदक मी आई, वडील, मित्रपरिवार यांना समर्पित करते. शिक्षणाने मिळालेल्या ज्ञानाचा समाजासाठी वापर करण्याला मी प्राधान्य देईन.

जबाबदारी आणि कर्तव्याचे भान देणारे पदक

कुलपती पदकप्राप्त वेदिका कदम म्हणाल्या, भाषा व सामाजिक शास्त्रे याविषयात विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल मिळणारे कुलपती पदक हे माझ्यासाठी केवळ एक पारितोषिक नाही, तर भविष्यात जबाबदारी व कर्तव्याचे भान देणारा सन्मान आहे, असे मी मानते. मी भाषा व सामाजिक शास्त्र या विषयाचा अभ्यास करत असल्याने समाजासाठी माझे शिक्षण उपयोगी आणून या पदकाचा मान मी वाढवणार आहे. या प्रवासात माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि शिक्षक यांचे प्रोत्साहन मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT